महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डहाणू नगरपरिषद हद्दीत 13 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन - palghar latest news

डहाणू नगरपरिषद हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी डहाणू नगरपरिषद हद्दीत 13 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

dahanu
dahanu

By

Published : Aug 4, 2020, 5:30 PM IST

पालघर- जिल्ह्यासह डहाणू नगरपरिषद हद्दीतदेखील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे परिसरात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डहाणू नगरपरिषद क्षेत्रात आजपासून 13 ऑगस्टपर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

डहाणू तालुक्यात आजवर 613 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यापैकी 427 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 183 सक्रिय (अ‌ॅक्टीव्ह) रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डहाणू तालुक्यात 79 प्रतिबंधित क्षेत्र असून यातील नगरपरिषदेसह इतर भागात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर डहाणू नगरपरिषद हद्दीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रात आजपासून 13 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.

याकाळात परिसरात मेडिकल, दवाखाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद असणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व बंदचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details