पालघरLive in Partner Killed Woman :तरुणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनरनं त्याच्या पत्नीसोबत मिळून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन मारेकऱ्यांनी गुजरातमधील वापी परिसरात फेकल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मारेकरी हा कॉस्च्युम डिझायनर आहे. मात्र अत्याचाराची तक्रार मागं घेण्याच्या वादातून या तरुणीचा खून करण्यात आला असून मारेकऱ्याला मंगळवारी अटक केल्याचंही सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी सांगितलं.
लिव्ह इन पार्टनरनं पत्नीसोबत मिळून केला खून : तरुणीची कास्च्युम डिझायनर असलेल्या आरोपीसोबत ओळख झाली होती. यातून ते दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. मात्र या प्रकरणावरुन आरोपी आणि त्याच्या पत्नीत वाद होत होते. त्यामुळे या दोघा पती पत्नीनं तरुणीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुटकेसमध्ये भरुन फेकला मृतदेह :तरुणीचा खून केल्यानंतर आरोपीनं पत्नीच्या मदतीनं तो सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गुजरात राज्यातील वापी या शहरातील परिसरात फेकल्याची माहिती पद्मजा बडे यांनी दिली.
विवाहित आरोपीसोबत होती तरुणी लिव्ह इनमध्ये : ही तरुणीची कॉस्च्युम डिझायनर असलेल्या आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर या दोघात प्रेमसंबंध जुळून आल्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र कॉस्च्युम डिझायनर असलेला आरोपी हा विवाहित होता. त्यामुळे त्याचं आणि त्याच्या पत्नीमध्ये या तरुणीवरुन वारंवार भांडणं होत होती.
लग्नाचा तगादा लावल्यानं खून :ही तरुणी तिचा लिव्ह इन पार्टनर असलेल्या आरोपीकडं लग्न करण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पीडितेच्या बहिणीनं दिली. मात्र आरोपीसह लग्न करण्यास त्याच्या पत्नीचा विरोध होता. त्यामुळे आरोपीसोबत तिचं वारंवार भांडण होत होतं. त्यामुळेच आरोपीनं आणि त्याच्या पत्नीनं तरुणीचा खून केल्याचा आरोप पीडितेच्या बहिणीनं केला आहे.
पोलिसांनी पती पत्नीच्या आवळल्या मुसक्या :या तरुणीसोबत 12 ऑगस्टपासून संपर्क होत नव्हता. तिला बाहेर देशात चित्रपटाच्या शूटींगसाठी जायचं होतं. त्यामुळे तिच्या बहिणीसोबत संपर्क करुन तरुणी गायब असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पीडितेच्या बहिणीनं 12 ऑगस्टला बेपत्ता झाल्याची नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस पीडितेचा शोध घेत होते. मात्र मारेकऱ्यानं त्याच्या पत्नीसोबत मिळून 9 ऑगस्टलाच खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली. पोलिसांनी मारेकरी आणि त्याच्या पत्नीला अटक केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- Saraswati Vaidya Murder Case: सरस्वती वैद्य हत्याकांड: 'लिव्ह इन पार्टनर'ला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी
- Minor Burn Cigarette : आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून चार वर्षाच्या चिमुकल्याला सिगारेटचे चटके, नराधमाकडून मुलांचा छळ