वसई - वसईत स्मार्ट फोनचा वापर ( Use of smart phones ) करणं साडे तीन वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतले आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मोबाईलच्या नादात खाली पडून साडे तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी ( Little girl dies after falling from building ) मृत्यू झाला आहे.
श्रेया महाजन ( Shreya Mahajan ) असं या मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या अग्रवाल कॉम्प्लेक्स मधील रेजन्सी वीला ( Regency Villa ) या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातव्या मजल्यावर राहणाऱ्या श्रद्धा महाजन या शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे श्रेयाच्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या.