पालघर/विरार - छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आजची तरुण पिढी सांगत असली तरी त्यांनी निर्मिती केलेल्या किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबाबत हीच तरुणपिढी तितकीशी उत्सुक दिसत नाही. या उलट लढण्याची आणि जगण्याची शक्ती, प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा उपयोग अनैतिक गोष्टींसाठी केला जात आहे.
दारू पिणाऱ्या, प्रेमचाळे करणारे तरुण-तरुणी या ऐतिहसिक ठेव्याची रया घालवताना दिसत आहेत. अशाच तरुणांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम विरार येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या चिमुकलीने केले आहे.
विरार अर्नाळा येथील किल्ल्याला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, हा किल्लाही अनैतिक गोष्टींपासून दूर राहिलेला नाही. या किल्ल्यावर येणारे अनेक जण या ठिकाणीच दारू पितात. दुर्दैव म्हणजे या दारूच्या बाटल्या याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे या किल्ल्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. मात्र, पोलीस कर्मचारी निनाद पाटील यांच्या चिमुकलीने आपल्या वडिलांसोबत या बाटल्या जमा करून किल्ल्याची स्वच्छता तर केली; पण आपल्या या कामाने अशा अनैतिक गोष्टी करणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले.
चिमुकलीने घातले अनैतिक गोष्टी करणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यात अंजन! - पालघर विरार बातम्या
उर्वी पाटील असे या चिमुकलीचे नाव आहे. अर्नाळा येथे राहणारी उर्वी येथीलच जॉन ट्वेंटीथर्ड कॉनव्हेन्ट शाळेत ज्युनियर केजीत शिकते. तिचे वडील निनाद पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. मागील साडेतीन वर्षे उर्वी वडिलांना सामाजिक कामांमध्ये हातभार लावत आहे.
पालघर
वडिलांना सामाजिक कामांमध्ये हातभार
उर्वी पाटील असे या चिमुकलीचे नाव आहे. अर्नाळा येथे राहणारी उर्वी येथीलच जॉन ट्वेंटीथर्ड कॉनव्हेन्ट शाळेत ज्युनियर केजीत शिकते. तिचे वडील निनाद पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. मागील साडेतीन वर्षे उर्वी वडिलांना सामाजिक कामांमध्ये हातभार लावत आहे. विशेष म्हणजे अर्नाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेला देवनागरी शिलालेख बोलणारी एवढ्या लहान वयातील ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव मुलगी आहे.