महाराष्ट्र

maharashtra

विरारमध्ये वाईन शॉप बाहेर मद्यपींचा राडा; उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटके देऊन हाकलले

By

Published : May 10, 2020, 5:22 PM IST

तिघा मद्यपींची हाणामारी बघण्यासाठी इतर मद्यपींनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी व वाइन शॉपच्या कर्मचाऱ्यांनी फटके देऊन या दारुड्यांना हाकलून लावले.

liquor drinkers fight virar
मद्यपींचे भांडण

पालघर- विरारमध्ये दारूची दुकाने सुरू झाली आहे. मात्र, दारू प्यायल्यानंतर मद्यपींकडून रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचा प्रकार समोर येत आहे. आज दुपारी विरारमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. विरार पश्चिमेकडील राज वाईन्स शॉप शेजारी ३ मद्यपींनी राडा घातला.

भर रस्त्यात दारूच्या नशेत तिघांनी आपापसात भांडण करून धिंगाणा घातला. यावेळी तिघांमध्ये हाणामारी झाली. तिघांची हाणामारी बघण्यासाठी इतर तळीरामांनी गर्दी केली होती. यावेळी घटनास्थळावर उपस्थित राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी व वाईन्स शॉपच्या कर्मचाऱ्यांनी फटके देऊन या दारुड्यांना हाकलून लावले.

हेही वाचा-गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरणी सीआयडीने केली आणखी 5 जणांना अटक; न्यायालयाकडून आरोपींना 19 मेपर्यंत पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details