महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने नाणेगावात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा पकडला. या कारवाईमध्ये 11 लाख 36 हजार 840 रूपये किंमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली.

जप्त केलेल्या मद्यसाठ्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी

By

Published : Oct 2, 2019, 5:44 PM IST

Updated : Oct 2, 2019, 5:50 PM IST

पालघर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने नाणेगावात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा पकडला आहे. निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये 11 लाख 36 हजार 840 रूपये किंमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकाने नाणेगावात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा पकडला


धिरज वसंत पाटील असे अटक केलेल्या दारू तस्कराचे नाव आहे. पाटीलकडून 15 खोकी दारूसाठा व तवेरा गाडी जप्त करण्यात आली. त्याचा साथीदार कल्पेश अनिल पाटील आणि सिल्वासा येथील निलेश भोया ऊर्फ तडवी या दोघांना दारूबंदी कायद्यांतर्गत फरार घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा - बोईसर : भाजपच्या संतोष जनाठेंचे पक्षाविरोधात बंड; उद्या भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक सुभाष जाधव करत आहेत. या अगोदर विक्रमगड येथे भेसळयुक्त दारू बनवणा-यांवर या पथकाकडून कारवाई करण्यात आली होती.

Last Updated : Oct 2, 2019, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details