पालघर- मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरीजवळ ओसरविरा फाटा येथे अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे
पालघरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Palghar latest news
मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या मृत्यू
मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत.