पालघर- डहाणू येथील राम टेकडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने 85 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
डहाणूत स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला तब्बल 85 किलो गांजा; दोघांना अटक
अटक केलेल्या दोघांच्या विरोधात डहाणू पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गांज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
पोलीसांनी अटक केलेले आरोपी
स्थानिक गुन्हे शाखा पालघरच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना रेखा उर्फ नगमा आयुब शेख (वय 40) व संतोष दुर्योधन स्वाइन (वय 38) यांच्याकडून काळपट रंगाची पाने-फुले, काड्या व बीया असलेल्या वनस्पतींचे शेंडे असा 85 किलो 285 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
जप्त केलेल्या गांज्याची एकूण किंमत 10 लाख 23 हजार 744 रुपये इतकी आहे. गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरता आपल्याजवळ बाळगल्या प्रकरणी दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.