महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये 24 तासांत 93 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण संख्या 1 हजार 476 - लेटेस्ट कोरोना न्यूज

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात आज 93 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 476 झाली आहे.

last 24 hours 93 corona positive cases found in vasai virar
वसई-विरारमध्ये 24 तासांत 93 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : Jun 13, 2020, 10:16 PM IST

पालघर - सध्या कोरोनाने संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात थैमान घातले आहे. आज (शनिवार) या परिसरात 93 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच, आज 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज 93 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 476 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 53 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 679 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details