पालघर- राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (21ऑक्टोबर) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पथके नियोजित मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत.
मतदान पथकासोबत रवाना होताना महिला पोलीस कर्माचाऱ्यांनी लुटला सेल्फीचा आनंद - महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सेल्फी
मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी मतदान पथकासोबत सेल्फी काढत असल्याचे पाहावयास मिळाले.
मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही
मतदान पथकांसोबत रवाना होण्याआधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी मतदान पथकासोबत सेल्फी काढत असल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे. चोख पोलीस बंदोबस्तात हे साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांसाठी रवाना होत आहेत.