महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Knife Attack on Couple : नालासोपारा येथे दाम्पत्यावर चाकुहल्ला, हल्लेखोराचा शोध सुरू - नालासोपारा येथे दाम्पत्यावर चाकुहल्ला

एका दाम्पत्यावर चाकूने हल्ला ( Knife Attack on Couple )झाल्याची घटना शनिवारी (दि. 18 डिसेंबर) पहाटे नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्यावर मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुळींज पोलीस पुढील तपास करत आहेत.

जखमी दाम्पत्य
जखमी दाम्पत्य

By

Published : Dec 18, 2021, 8:40 PM IST

विरार (पालघर) - विवाहित महिलेवर व तिच्या पतीवर चाकूने प्राणघातक हल्ला ( Knife Attack on Couple ) केल्याची घटना शनिवारी (दि. 18 डिसेंबर) पहाटे नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन येथे घडली आहे. संतोष भुवन येथील लसवीर मंदिर येथे राहणारे अमित मिश्रा व त्यांची पत्नी ज्योती मिश्रा (दोघे रा. लसवीर मंदिर परिसर, नालासोपारा पूर्व), असे हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व स्थानिक

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मिश्रा दाम्पत्य घरात असताना ज्योती मिश्रा यांच्या ओळखीचा उत्तर प्रदेश येथील एक युवक जबरदस्तीने घरात घुसला. त्यानंतर त्यांने मिश्रा दाम्पत्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी दोघांनीही हल्लेखोराला प्रतिकार करत आरडाओरडा केला. त्यामुळे त्या युवकाने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात मिश्रा दाम्पत्य जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्या हल्लेखोर युवकाची माहिती व फोटो पोलिसांना मिळाला आहे. फोटो व माहितीवरुन त्या युवकाचा शोध सुरू असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

हे ही वाचा -Vaccine By Drone : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूक प्रयोग यशस्वी

ABOUT THE AUTHOR

...view details