महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवा; पालघर नगरपरिषदेचे आदेश - पालघर अत्यावश्यक सेवा

शासनाच्या आदेशानुसार काही दुकाने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यासाठी व्यापारी असोसिएशनला नगरपरिषदेने सूचना दिल्या होत्या. मात्र नियम धाब्यावर बसवून अनेक दुकाने सुरू असल्याचे व अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालघर नगरपरिषदेने दिले आहेत.

Palghar
पालघर

By

Published : May 17, 2020, 10:11 AM IST

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा बंद आहेत. मात्र, पालघर नगरपरिषद क्षेत्रात जीवनावश्यक सेवा वगळता एका रोडवरील इतर पाच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे नियम धाब्यावर बसवून अनेक दुकाने सुरू असल्याचे व अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालघर नगरपरिषदेने दिले आहेत.

पालघरमध्ये अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

शासनाच्या आदेशानुसार काही दुकाने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यासाठी व्यापारी असोसिएशनला नगरपरिषदेने सूचना दिल्या होत्या. मात्र, हे नियोजन करणे अशक्य असल्याचे व्यापारी आणि दुकानदारांच्या संघटनेमार्फत कळवण्यात आले. तसेच नगरपरिषद क्षेत्रात अनेक ठिकाणी दुकाने खुली केली. नागरिकही विनाकारण घराबाहेर पडून ठिकठिकाणी गर्दी करत, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे पहायला मिळाले.

नगरपरिषदेने काढलेला आदेश

नगरपरिषदेने अशा दुकानदारांकडून दंड वसूल केल्यानंतरही दुकाने सुरूच होती. त्यामुळे नगरपरिषदेने दुकाने बंद ठेवण्याचा आदेशच काढला आहे. नगरपालिकेच्या या आदेशानुसार पालघर शहरातील माहीम रस्ता, कचेरी रस्ता, टेम्भोडे रस्ता, देवीसहाय रस्ता, मनोर रस्ता, मनोर माहीम हायवे या मुख्य रस्त्यांवरील अत्यावश्यक व जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील. रस्त्यांवरील फेरीवाले, रस्त्याच्या कडेला बसणारे भाजी विक्रेते यांनाही बंदी घालण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details