पालघर -इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन. या दिनाच्यानिमित्ताने वसई ग्रामीण भागातील कौशिक जाधव या युवकाने दगडांवर क्रांतिकारकांचे चित्र रेखाटून त्यांना एक आगळीवेगळी मानवंदना दिली आहे.
हेही वाचा -वसईत औद्योगिक कंपनीतल्या बॅायलरचा भीषण स्फोट, 1 ठार, 3 गंभीर
वसई पूर्वेतील भाताने येथे राहणाऱ्या कौशिक जाधव याने घराच्या आजूबाजूला असलेल्या विविध आकाराचे दगड घेऊन त्यावर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस अशा विविध क्रांतिकारकांची चित्र रेखाटली आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना माझ्या कलेच्या माध्यमातून छोटीशी मानवंदना देण्याचा प्रयत्न होता. ज्याप्रमाणे आपण पेपरवर चित्र काढू शकतो, त्याप्रमाणे नैसर्गिक दगड आहेत त्यावरही चांगल्या प्रकारे चित्र काढली जाऊ शकतात, असे कौशिकने सांगितले. याआधी त्याने पेन्सिल, रबर, पेन यांचा वापर करून विठ्ठल साकारला होता. तर, आता क्रांतिदिनी त्याने दगडावर विविध रंगांचा वापर करून क्रांतिकारकांची चित्रे रेखाटली आहेत.
हेही वाचा -पालघर 'अनलॉक' करा, आमदार क्षितीज ठाकूर यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी