पालघर- कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्याने हातावर कामावणाऱ्या मजुरांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा व्यक्तींना अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती मदतकार्य करून धान्य वाटप करीत आहेत.
जेएसडब्ल्यू फाउंडेशन मार्फत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मजुरांना 'रेडी टू फूड खिचडी' वाटप - संगीता सज्जन जिंदाल
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्याने हातावर कामावणाऱ्या मजुरांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा व्यक्तींना अनेक सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती मदतकार्य करून धान्य वाटप करीत आहेत.
जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता सज्जन जिंदाल यांनी पुढाकार घेऊन तारापूर येथील औद्योगिक क्षेत्रातील मजुरांना व संघटित कामगारांना मदतीचा हात पुढे आहे. या मजुरांना मजुरांना 'रेडी टू कुक फूड खिचडी' प्रिमिक्सची दोन किलोची तयार पाकीटे वाटप करण्यात आली आहेत. जेएसडब्ल्यू स्टील तारापूरचे प्रबंधक बबन जाधव यांच्यासह गिरीष विघे व लक्ष्मी चांदणे, पोलीस अधिकारी प्रदीप कसबे यांच्याहस्ते या मजुरांना रेडी टू कूक खिचडीचे वाटप करण्यात आले. संपूर्ण पालघर जिल्ह्यात जेएसडब्ल्यू फाउंडेशनतर्फे अशी ४००० हजार पाकिटे गरजूंना देण्यात येणार आहेत.