महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या - Nalasopara

शैलेशकुमार सिंग (५१) हे जेट एअरवेजमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होते व त्यांना पोटाचा कर्करोग होता. सिंग यांचा मुलगाही जेट एअरवेज कंपनीत कामाला होता. मात्र, जेट ऐअरवेज कंपनी बंद पडल्यामुळे नुकतीच त्याची नोकरी गेली. नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे समजते.

शैलेशकुमार सिंग

By

Published : Apr 28, 2019, 12:32 AM IST

पालघर - मुलाची जेट एअरवेजमधील नोकरी गेल्यामुळे आणि कर्करोगामुळे त्रस्त असल्यामुळे एका व्यक्तीने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शैलेशकुमार सिंग असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नालासोपारा पूर्व येथील ओस्वाल नगरी, साईपुजा इमारत येथील रहिवासी शैलेशकुमार सिंग (५१) हे जेट एअरवेजमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होते व त्यांना पोटाचा कर्करोग होता. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते जवळपास दोन वर्षांपासून मेडिकल लिव्हवर असल्याचे समजते. सिंग यांचा मुलगाही जेट एअरवेज कंपनीत कामाला होता. मात्र, जेट ऐअरवेज कंपनी बंद पडल्यामुळे नुकतीच त्याची नोकरी गेली. उपचाराने बरे वाटत नसल्याने त्रस्त व त्यात मुलगाही बेरोजगार झाल्याने सिंग निराश झाले होते.

शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी आपल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. इमारतीच्या गच्चीवर गेल्यावर नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, त्यापूर्वीच सिंग यांनी इमारतीवरून खाली असलेल्या नाल्यात उडी मारली व त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details