पालघर-येथील जव्हार संस्थानात पूर्वी बाराव्या-तेराव्या शतकात राजाची हुकमत चालत होती. जयबा राजानंतर धुळबा राजाची नावे येथे अग्रक्रमाने घेतली जातात. मात्र, या जव्हार संस्थानाचा इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा आता येथील प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे मोडकळीस आला आहे.
जव्हार संस्थानाचा ऐतिहासिक वारसा भग्नावस्थेत; प्रशासनाचे दुर्लक्ष
जव्हार संस्थानातील वास्तू प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे धूळ खात पडली आहे. येथील राजवाडा नगरपरिषदकडे आहे. सुरत येथील स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन राजा यांच्यात जव्हार ठिकाणी भेट झाली होती. त्या ऐतिहासिक ठिकाणाला शिरपामाळ असे संबोधले जाते.
हेही वाचा-यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? फडणवीसांचा चव्हाणांना टोला
राजा यशवंराव मुकणे यांच्यानंतर हे संस्थान खालसा झाले. त्यानंतर येथे जव्हार नगरपरिषद तयार झाली. मात्र, आज जव्हार संस्थानाच्या ऐतिहासिक ठेव्याची भग्नावस्था झाली आहे. जव्हार शहराच्या उत्तरेच्या बाजूला जुना राजवाडा आहे. हा जुना राजवाडा 1750 ते 1827 या कालावधीत बांधण्यात आला. राजा यशवंतराव यांनी बक्षीसपत्राने हा राजवाडा नगरपरिषदेकडे सुपूर्द केल्याचा फलक राजवाडा समोर लावण्यात आला आहे. सध्या हा राजवाडा नगरपरिषदकडे आहे. मात्र, येथील राजवाड्याच्या परिसरातील गणेश मंदिर, जुने पाण्याचे हौद याची देखभाल होत नाही. त्यामुळे हे गतवैभव आज धुळीस मिळत असल्याची चर्चा होत आहे. जव्हार शहराच्या दक्षिण बाजूच्या दिशेने काजू-चिकूच्या विस्तीर्ण बागेत नवीन राजवाडा पहायला मिळतो. त्याचेही आता डागडुजी बांधकाम केले जात आहे.
सुरत येथील स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन राजा यांच्यात जव्हार ठिकाणी भेट झाली होती. त्या ऐतिहासिक ठिकाणाला शिरपामाळ असे संबोधले जाते. हे ठिकाण येथील पूर्व दिशेला आहे.