महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जव्हार शहरचा बायपास रोड खचल्याने वाहतूक बंद; तहसीलदारांची पाहणी पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू - पालघर वाडा मुसळधार पाऊस

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात सार्वजनीक नुकसान झाले आहे. असाच एक प्रकार जव्हार शहराबाहेरुन जाणाऱ्या बायपास रस्त्याबाबतीत घडला आहे. रस्ता मध्येच खचला असून आता पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तहसीलदार संतोष शिंदे रस्त्याची पाहणी करताना

By

Published : Aug 4, 2019, 10:16 PM IST

Updated : Aug 4, 2019, 11:49 PM IST

पालघर (वाडा) - राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नुकसान झाले आहे. असाच एक प्रकार जव्हार शहराबाहेरुन जाणाऱ्या बायपास रस्त्याबाबतीत घडला आहे. रस्ता मध्येच खचला असून आता पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जव्हार शहरचा बायपास रोड खचल्याने वाहतूक बंद

रस्त्याची पाहणी करण्यासाठी जव्हार तहसीलदार संतोष शिंदे स्वत: आले असून प्रशासन याकडे लक्ष देत असल्याचे सांगितले. शिवनेरी ढाब्यापासून २०० मीटर अंतरावर रोड खचला असून या बायपास रस्त्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणजे गावातून वाहतूक सुरळीत चालू आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 11:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details