पालघर - कुणाचे तरी नुकसान होऊन एखादा प्रकल्प पूर्ण होत असतो. या प्रकल्पाला विरोध होत असतो. मात्र, अशावेळी सामंज्यस्याने आणि समजुतीने पुढे गेले पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाडा येथे वक्तव्य केले. ते माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते.
हे बंदर केंद्र सरकारचे आहे. यावर वाढवणविरोधी संघर्ष समिती ही या बंदराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेऊ पाहत आहेत. मात्र, ती भेट त्यांना मिळत नाही, असा आरोप समितीकडून होत आहे. या वाढवण बंदराबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी यावर एखादा रस्ता तरी रुंद करायचा असेल तर शेतकरी विरोध करीत असतो. सामज्यास्याने प्रक्लप पुढे गेला पाहिजे. कायदे दाखून, दंडेलशाही करून आणि नुकसानी भरपाईची आमिष दाखवून चालत नाही. समजा धरण नाही झाले तर तेथील हजारो एकर शेती कशी होणार, बंदर नाही झाले तर रोजगार कसा मिळणार व्यापार कसा होणार, श्रीमंती कशी येणार असे वक्तव्य करून वाढवण बंदर प्रश्नी हा प्रकल्प सामज्यास्याने प्रकल्प पुढे गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वाढवण बंदर प्रश्र्नी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत -
हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही आहेत. असे प्रश्न उपस्थित पत्रकारांनी केल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बाबत आंदोलनकर्त्यांना भेट द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण प्रश्नाबाबत आंदोनकर्त्यांचे एकले पाहिजे, समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि उत्तरे शोधली पाहिजेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांना बरोबर घेऊन केंद्र सरकार कडे गेले पाहिजे, अशी सूचना यावेळी केली.