महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

School Buildings Issue In Dahanu : शाळांचा प्रश्न ऐरणीवर, डहाणू तालुक्यातील 39 इमारती धोकादायक - सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक

पालघर-डहाणू पंचायत समितीच्या ( Palghar Dahanu Panchayat Samiti ) शिक्षण विभागाअंतर्गत अनेक शाळांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी शाळांचे बांधकाम कोसळत आहे. या सर्व परिस्थीतीबाबत शिक्षण विभागाने हा प्रस्ताव ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक यांच्याकडे ( Superintendent of PWD ) पाठवला आहे. तिथे या धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, वर्गखोल्या जैसे थेच आहे. सर्व शिक्षा अभियानातून बांधलेल्या अशा धोकादायक वर्गखोल्या तोडण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभिप्राय देत नाही. अशी माहिती या विभागाचे डहाणूतील उपअभियंता खराडे यांनी सांगितले.

school buildings issue
शाळांच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

By

Published : Jul 16, 2022, 10:49 AM IST

पालघर-डहाणू - पालघर-डहाणू पंचायत समितीच्या ( Palghar Dahanu Panchayat Samiti ) शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील 39 वर्गखोल्या या धोकादायक ( 39 classrooms are dangerous ) ठरल्या आहेत. त्यामध्ये पळे बोरीपाडा येथील एका इमारतीचा ( boripada school building ) समावेश आहे. या धोकादायक इमारती नजीकची वर्गखोली 5 जुलै रोजी जमीनदोस्त झाली. त्याला आठवडा उलटला तरी धोकादायक इमारतींवर तोडक कारवाईचा अभाव आहे. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थी-शिक्षकांसाठी हा मृत्यूचा सापळा बनला आहे.

शिक्षण विभागाशी संपर्क -या सर्व परिस्थीतीबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला ( Contact Education Department ) असता, याकरिता तालुकास्तरावरून समग्र शिक्षा अभियानाच्या कनिष्ठ अभियंत्याकडून जिल्ह्याला प्रस्ताव पाठवला जातो. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि समग्र शिक्षा कार्यकारी अभियंता त्यावर स्वाक्षरी करून हा प्रस्ताव ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षकांकडे ( Superintendent of PWD ) गेल्यानंतर हे धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी परवानगी दिली जाते.

वर्गखोल्या जैसे थेच - परंतु सर्व शिक्षा अभियानातून बांधलेल्या अशा धोकादायक वर्गखोल्या तोडण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभिप्राय देत नाही. अशी माहिती या विभागाचे डहाणूतील उपअभियंता खराडे यांनी सांगितले. या तांत्रिक अडचणीमुळे धोकादायक वर्गखोल्या जैसे थे आहेत. त्यांचे शासन मान्य एजन्सीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागेल. परंतु समग्र शिक्षा अभियान विभागाला त्यासाठी शासन निधी मंजूर नसल्याने तालुकास्तरीय प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. डहाणू तालुक्यात मागील तीन वर्षात शेकडो छोटे-मोठे भूकंपाचे धक्के बसले असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर - डहाणू तालुक्यातील शाळांच्या धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर असून तांत्रिक अडचणी, प्रशासकीय मुद्दे इ. पुढे करून तोडक कारवाईला विलंब होत आहे. जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा असून मुसळधार पाऊस व जोराचे वारे वाहत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. असंवेदनशील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षते बद्दल संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा -Explanation by Uday Samant : 'जे झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता...', उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details