पालघर : श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर वसईत चिंतेचे वातावरण ( Shraddha Walkar murder case ) आहे. ही स्थिती असताना स्थानिक संघटनांच्या विरोधामुळे सई शहरात नवविवाहित हिंदू-मुस्लिम जोडप्याचा रिसेप्शन रद्द ( Interfaith couples wedding reception ) करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने मे महिन्यात श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या केल्याचे उजेडात आले. त्याला आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. श्रद्धा ही मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातील वसई येथील ( wedding reception cancelled in Vasai ) रहिवाशी आहे.
व्हायरल ट्विटमुळे रिसेप्शन रद्द :शुक्रवारी सकाळी एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने ( editor tweet on interfaith marriage ) नवविवाहित हिंदू-मुस्लिम जोडप्याचे रिसेप्शनचे छायाचित्र ट्विट केले. त्याला लव्हजिहाद आणि अॅक्टऑफ टेररिझम हॅशटॅग वापरून वालकर हत्या प्रकरणाशी जोडले. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, वसईतील स्थानिक हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी हॉलच्या मालकाला फोन केला. परिसरात शांतता राखण्यासाठी कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दोन्ही कुटुंबाचा विवाहाला होकार :रिसेप्शनचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी वसई पश्चिम भागातील एका हॉलमध्ये होणार होता, असे एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी या जोडप्याच्या कुटुंबीयांनी माणिकपूर पोलीस स्टेशनला भेट दिली. रिसेप्शन स्थगित ठेवल्याची माहिती दिली, असे ते म्हणाले. या अधिकाऱ्याने सांगितले की, हिंदू असलेली ही महिला 29 वर्षांची आहे, तर तिचा पती, मुस्लीम, 32 वर्षांचा आहे आणि दोघेही गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला. या जोडप्याने 17 नोव्हेंबर रोजी न्यायालयात नोंदणीकृत विवाह केला. रविवारी रिसेप्शनसाठी सुमारे 200 पाहुणे अपेक्षित होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाला कोणताही तथाकथित लव्ह जिहाद अँगल नसल्याचेहीअधिकाऱ्याने सांगितले.
हिंदू महिलांशी विवाह करून इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा कट करणे म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा आरोप काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून केला जात आहे.