पालघर -जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आले असून ठेकेदार आणि बांधकाम विभाग विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी पाटील पाडा ( Chinchani Patil Pada ) येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या ( inferior quality construction Zilla Parishad school ) शाळेच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असून इमारतीचे पिलर हलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद अवस्थेत असल्याने अनेक शाळांची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. अशातच चिंचणी येथील जि.प.शाळेचे दुरुस्तीचे बांधकाम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांनी उघडकीस आणले आहे. बांधकामासाठी वापरण्यात येत असलेले रेती, सिमेंट सारखे साहित्य अतिशय अल्प दर्जाचे असून यामुळे जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार हे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची उघड झाले आहे.