महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar : पालघर जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा; ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी - health department

सततच्या वातावरण बदलामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. पालघर जिल्ह्यात देखील सर्दी, ताप, खोकला, डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, सर्दी- पडसे आदी साथीच्या आजाराने (Infection Diseases Reported in Palghar District) विळखा घातला आहे. ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी (Examination of more than 70 thousand patients) केली असता, त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे, आदी साथीच्या रोगाचे आहेत. आरोग्य विभाग (health department) व नगरपालिका प्रशासनाकडून (Municipal administration) अनेक उपाय याेजना केल्या जात आहे.

Palghar district infection diseases
पालघर जिल्हयात साथीच्या आजारांचा विळखा

By

Published : Aug 5, 2022, 8:36 PM IST

पालघर :सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी, ताप, खोकला, डेंगू सर्दी, पडसे आदी साथीच्या आजाराने (Infection Diseases Reported in Palghar District) विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. अचानक झालेल्या हवामान बदल यासह तापमान बदल यामुळे साथ रोग झपाट्याने वाढू लागले आहेत, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी व खाजगी रुग्णालयात सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी (Examination of more than 70 thousand patients) केली असता, त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे, आदी साथ रोगाचे आहेत. पालघर जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागात तसेच शहराच्या काही ठराविक भागांत डासजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, अशा तापजन गंभीर आजाराबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळ्यात दरम्यान आढळून येत आहेत. मलेरिया रुग्णाची संख्या कमी असली तरी डासांच्या प्रादुर्भावामुळे तो वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.


अलीकडेच तलासरी तालुक्यात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसह ते इतर परिसरातही स्वाइन फ्लूचे जवळपास 30 रुग्ण आढळून आले होते. मात्र योग्य उपचारामुळे ते वेळीच बरे झाले. साथीजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित घेणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवणे, यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनी स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असल्याचे, आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. सध्या आरोग्य विभागाकडून संशयित नागरिकाची आरोग्य तपासणी करून, प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. साथीचेरोग असलेले रुग्ण याची तपासणी व त्यातून निदान केले जात आहे. साथ रोगाला आळा घालण्यासाठी पालघर नगरपालिका प्रशासनाकडून कीटकनाशक फवारणी, धूर करणे, पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकने, आदी उपायोजना करण्यात येत आहेत.


सध्या साथीचारोग वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, तापमान व हवामान बदलाचा परिणाम आहे. या दरम्यान संसर्गातून साथ रोग होतो. मात्र त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नाही. साथीचारोग सामान्य प्रकारचा व लवकर बरा होणारा आजार आहे, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. पालघर जिल्ह्यातील साथरोग रुग्ण संख्या वाढीबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांना विचारणा केली असता, सध्या साथरोग रुग्ण वाढत असले तरी; सामान्य उपचारामुळे ते बरे होत आहेत. त्यात भीतीचे कारण नाही. डासजन्य आजारासाठी आरोग्य विभाग, योग्य त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची तितकीच जबाबदारी आहे. त्यांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी ताप, खोकला, मलेरिया, डेंगू चिकन, गुनिया, आदी साथीच्या रोगाच्या आजाराने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.



डेंग्यूचा रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - २३ -३
फेब्रुवारी - ५१ - ८
मार्च - ११९ - ९
एप्रिल - ११३ - ५
मे - ११६ - ९
जून - ९८ - १४
जुलै - १३१ - ९
एकूण - ६५१ - ५७

--------/--------------------------

चिकनगुनिया रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
मार्च - ७ - ६
एप्रिल - ११ - ४
जुलै - ७ - १
एकूण - २७ - ११

-------------–------------------

लेप्टोस्पायरोसिस रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - ५ - १
फेब्रुवारी - ५ - २
मे - ३ -१
एकूण - १५ - ४
----------------------/-------

मलेरिया रुग्ण
ग्रामीण
रुग्ण रक्त तपासणी - १९२२७२
पॉझिटिव्ह - ८

मनपा व न.प
रुग्ण रक्त तपासणी - ७८५९४
पॉझिटिव्ह - ३३


तीन महिन्यात 144964 रुग्णांनी केली तपासणी :उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात बाह्य रुग्ण तपासणी करणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील बारा आरोग्य संस्थांमधून 41,746 रुग्णांनी तपासणी केली. मे मध्ये हा आकडा सुमारे पाच हजार रुग्णांनी वाढला. मे महिन्यात 46,118 रुग्णांनी बाह्यरुग्ण सामान्य तपासणी केल्या आहेत. तर जून मध्ये या आकड्यांमध्ये जवळपास नऊ हजार रुग्णांची भर पडली. जूनमध्ये 57 हजार 70 रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागात आपली सामान्य तपासणी केली आहे.

हेही वाचा :Millets vs Malnutrition : ओडिशातील अंगणवाड्यांमध्ये पौष्टिक समृद्ध अन्नाद्वारे सुपर क्रॉपचे पुनरुज्जीवन

ABOUT THE AUTHOR

...view details