पालघर- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी व महाविकास आघाडीच्या 'शिवभोजन' योजनेचा आज (दि. 26 जानेवारी) पालघर येथे राज्याचे कृषिमंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पालघर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात एकवीरा महिला बचत बचत गटाच्या माध्यमातून ही शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे.
गरीब व गरजू व्यक्तींना 10 रुपयांत पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे, असे पदार्थ मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यात शिवाभोजन योजनेअंतर्गत 450 थाळी देण्यात येणार असून या योजनेचा लाभ गरीब गरजू व्यक्तींना घेता येणार आहे. भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा - वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना, गरोदर मातांसह बालकांना पुरवणार अत्याधुनिक सुविधा