महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसरमधील कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - पालघर जिल्हा लेटेस्ट न्यूज

तालुक्यातील बोईसरमध्ये अधिकारी लाईफलाईन रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज कृषीमंत्री तशा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर बोईसर येथील लाईफलाईन रुग्णालयात 60 खाटांचे कोविड सेटंर तयार करण्यात आले आहे.

बोईसरमधील कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बोईसरमधील कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By

Published : Apr 19, 2021, 10:46 PM IST

पालघर -तालुक्यातील बोईसरमध्ये अधिकारी लाईफलाईन रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज कृषीमंत्री तशा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर बोईसर येथील लाईफलाईन रुग्णालयात 60 खाटांचे कोविड सेटंर तयार करण्यात आले आहे.

बोईसरमधील कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

60 बेडेचे कोविड सेंटर

पालघर सारख्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णालय, व्हेंटिलेटर बेड्स आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता लक्षात घेऊन, बोईसर येथील अधिकारी लाइफलाइन या खासगी रुग्णालयाचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 60 बेड्सच्या या रुग्णालयात 25 ऑक्सीजन बेड, 5 व्हेंटिलेटर बेड आणि साधे 30 बेड अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमुळे परिसरातील कोविड रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे. दरम्यान रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा शासनाने करावा अशी मागणी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा -मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details