महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाडामधील पुतळ्याचे अनावरण - Atal Bihari Vajpayee

वाडा येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भारतातील पहिल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

ATAL BIHARI

By

Published : Feb 9, 2019, 12:48 PM IST

पालघर- वाडा येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भारतातील पहिल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वयाच्या ९३ व्या वर्षी १६ ऑगस्ट २०१८ ला निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात त्यांचे स्मारक बांधले जाईल, असे सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी वाडा येथे दिवंगत वाजपेयींच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा राजस्थानमधील किसनगड येथील ब्लॅक ग्रॅनाईट, मकराना, मार्बल यांचा वापर करून बनवण्यात आला. तसेच छज्जा ढोलपुरी दगडाचाही यामध्ये वापर करण्यात आला आहे. हा पुतळा राजस्थान येथील मूर्तिकार कैलास अग्रवाल यांनी बनवला आहे.

या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री विष्णु सावरा, खासदार कपिल पाटील, राजेंद्र गावित, आमदार भास्कर धनारे, श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details