महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाल्यात उतरलेला पालिका कर्मचारी अद्याप बेपत्ता, वसईतील घटना - Dashrath Patil missing

वसई नालासोपारा नगरपालिकेचा कर्मचारी बेपत्ता ( Vasai Municipal employee missing ) असल्याचे समोर आले आहे. दशरथ पाटील (वय 43) असे पालिका कर्मचाऱ्याचे ( Dashrath Patil missing ) नाव आहे. ते काही कामानिमित्त संतोष भवन येथील नाल्यात उतरला होते, मात्र ते बाहेरच आले नाही. गेल्या तीन दिवसांपासून ते बेपत्ता आहे.

Vasai Municipal employee missing
वसई नगरपालिका कर्मचारी बेपत्ता

By

Published : Aug 7, 2022, 10:31 AM IST

Updated : Aug 7, 2022, 11:00 AM IST

वसई (पालघर) - वसई नालासोपारा नगरपालिकेचा कर्मचारी बेपत्ता ( Vasai Municipal employee missing ) असल्याचे समोर आले आहे. दशरथ पाटील (वय 43) असे पालिका कर्मचाऱ्याचे ( Dashrath Patil missing ) नाव आहे. ते काही कामानिमित्त संतोष भवन येथील नाल्यात उतरला होते, मात्र ते बाहेरच आले नाही. गेल्या तीन दिवसांपासून ते बेपत्ता आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

माहिती देताना प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाईक

हेही वाचा -Narcotics Recovered Nalasopara: नालासोपाऱ्यात अमली पदार्थनिर्मिती; मुंबई क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

पालघर जिल्ह्यातील सफाळे जलसार येथे राहणारा दशरथ पाटील (वय ४३) हे वसई नालासोपारा महानगर पालिकेचा सफाई कंत्राटी कर्मचारी गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी बाराच्या दरम्यान कामावर असताना काही कामानिमित्त संतोष भवन येथील नाल्यात उतरले होते. गेल्या तीन दिवसापासून ते या नाल्यातून बाहेरच आले नाही. याबाबत दशरथ पाटील यांच्या कुटुंबीयांनी नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यापासून नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच वसई अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण नाला साफ केला. मात्र, दशरथ सापडले नाही.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ पाटील हे वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करीत होते. ते ४ तारखेला नाल्यातील प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक बाहेर काढत असताना अचानक आलेल्या पाण्यात वाहून गेला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेचे ठेकेदार आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही आयुधे देत नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. पाटील यांचा शोध घेतला असता मिळून न आल्याने त्यांचे नेमक काय झाल हे समजू शकले नाही. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे उप विभाग अध्यक्ष अमित नाईक यांनी केली आहे. तीन दिवसांपासून नालासोपारा संतोष भवन नाल्यात दशरथ पाटील यांची शोध मोहीम हाती घेतली असून पुढील तपास तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार करत आहेत. दरम्यान पालिकेच्या उपायुक्त चारुशीला पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या गावी असून अशी घटना घडल्याचे समजले नसून माहिती घेऊन सांगते, असे सांगितले.

हेही वाचा -Palghar : पालघर जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा; ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी

Last Updated : Aug 7, 2022, 11:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details