पालघर - बोईसर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील सहा जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बोईसर येथील बेटेगाव परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची शस्त्रक्रियेपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली असता, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या महिलेच्या सहवासातील ६ नातेवाईकांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.
बोईसर येथील 'त्या' कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह - पालघर जिल्हा कोरोना रुग्ण
बोईसर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील सहा जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापर्यंत ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बोईसरमध्ये सहा जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
संक्रमित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मंगळवारी त्यांचे कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. सहाही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापर्यंत ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.