पालघर- डहाणू तालुक्यातील कासा-सायवन रस्त्यावरील वाघाडी गावाच्या हद्दीत पोलिसांनी एका ईनोव्हा कारमधून महागडा अवैध विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
डहाणू तालुक्यात अवैध विदेशी दारूसाठा जप्त; एकास अटक - Sachin Patil illegal liquor traffic case
डहाणू तालुक्यातील कासा-सायवन रस्त्यावरील वाघाडी गावाच्या हद्दीत पोलिसांनी कार क्र. (एम.एच.46 झेड. 3387) ची झडती घेतली. यावळी कारमध्ये अवैध दारू आढळून आली.
डहाणू तालुक्यातील कासा-सायवन रस्त्यावरील वाघाडी गावाच्या हद्दीत पोलिसांनी वाहन क्र. (एम.एच.46 झेड. 3387) या क्रमांकाच्या कारची झडती घेतली होती. यावळी कारमध्ये अवैध दारू आढळून आली. कासा पोलिसांनी 58 हजार 560 रुपये किंमतीची अवैध विदेशी दारूसाठा व 5 लाख रुपये किंमतीची कार असा एकूण 5 लाख 58 हजार 560 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कार चालक सचिन रमेश पाटील (वय. 33) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-केळवे समुद्रकिनार्याची धूप रोखण्यासाठी 'जिओ बॅग्स'; पर्यावरणपूरक बंधाऱ्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग