महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत - पालघर क्राइम

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रोशन अशिफ अली (वय २६), अफजल नजीमुल्ला शेख (वय २८ ) अशी आरोपींची नावे आहेत.

weed seized in palghar
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, दुचाकीसह रंगेहाथ कारवाई

By

Published : Sep 1, 2020, 4:30 PM IST

पालघर - गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रोशन अशिफ अली (वय २६), अफजल नजीमुल्ला शेख (वय २८ ) अशी आरोपींची नावे आहेत.

पालघरमधील नंडोरे नाका परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून रोशन अशिफ अली आणि अफजल नजीमुल्ला शेख या दोघांना पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे गांजा सापडला. ते विक्री करण्यासाठी या भागात आल्याचे निष्पन्न झाले. संबंधित आरोपींकडे 1 किलो 700 ग्रॅम गांजा सापडला. याची किंंमत जवळपास 17 हजार रुपये आहे. तसेच एक तीन चाकी वाहन असा एकूण ३८ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात पालघर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 च्या कलम ८ (क), २० (ब) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील व पालघर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details