महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक, दोघांना अटक - palghar crime news

चिल्हार फाटा येथे मनोर पोलिसांनी एम. एच. 48 टी. 7881 या क्रमांकाच्या कारची झडती केली असता, पोलिसांना तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हे अवैध तंबाखूजन्य पदार्थ एका अज्ञात व्यक्तीकडून खरेदी करून विक्रीसाठी देण्यात येत होते.

पालघर
पालघर

By

Published : Dec 6, 2020, 1:18 PM IST

पालघर -मुंबई-अहमदाबाद महामार्गानजीक चिल्हार फाटा येथे कारमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर मनोर पोलिसांनी कारवाई केली आहे. चिल्हार फाटा येथे मनोर पोलिसांनी एम. एच. 48 टी. 7881 या क्रमांकाच्या कारची झडती केली असता, पोलिसांना तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हे अवैध तंबाखूजन्य पदार्थ एका अज्ञात व्यक्तीकडून खरेदी करून विक्रीसाठी देण्यात येत होते. या कारवाईत कार आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 4 लाख 36 हजार 720 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मनोर पोलिसांत गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तौफिक इक्बाल मेमन (वय 37, रा. उंबरगाव, गुजरात) व साजिद फारूख मेमन (वय 37, रा. संजाण, गुजरात) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात मनोर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details