पालघर- विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर भालीवली कोपरफाटा येथे अवैध वाहतुक करणारे टेम्पो पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारमध्ये अवैध रेती वाहतूक करणारी वाहने जप्त - MUMBAI AHEMEDABAD HIGHWAY
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर अवैध रेती वाहून नेत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी कोपरफाटा येथे सापळा रचला. यात अवैध वाहतुक करणारे टेम्पो पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर अवैध रेती वाहून नेत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी कोपरफाटा येथे सापळा रचला. यात कैलास सुर्यभान शिर्के (२६), बालाजी सुबराव कदम (३८), निखील रविंद्र पाटील, अनिल रामाझरेकर (४३), चालक संजय भानुदास भोईर (३४), विलास माणिक वझे यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये किंमतीचा टाटा हायवा ट्रक क्रमांक एम.एच.१५ ईजी ५५१५, तीन लाख किंमतीचा महिंद्रा बोलेरो पीकअप जीप क्र.एम.एच.४८/ए.वाय/६४६५, टाटा मोटार टेम्पो क्रमांक एम.एच ०४/बी.यु/६५२९, चोपन्न हजार किंमतीची ८ ब्रॉस रेती असा एकुण १९,५४,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.