पालघर - महाराष्ट्रात प्रवेश न दिल्यामुळे पोरबंदर, वेरावळ येथे शेकडो खलाशी अडकले आहेत. या सर्व खलाशांची अन्नधान्य, पाणी, मास्क अशी कोणतीही सुविधा नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या खलाशांनी महाराष्ट्र सरकारकडे त्यांना घरी घेऊन जाण्याची तसेच सेवासुविधा पुरवण्याची विनवणी केली आहे.
हेही वाचा....ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
गुजरातच्या वेरावळ भागात कार्यरत असणारे सुमारे दोन हजार खलाशी 4 एप्रिल रोजी आपल्या घरी परतण्यासाठी गुजरातमधील नारगोल, उंबरगाव भागात आले होते. या खलाशांना प्रथम गुजरातमधील स्थानिकांनी तिथे उतरण्यास मज्जाव केला. त्यानंतर ५ एप्रिल रोजी गुजरातमधील १,१२२ खलाशांना उतरवून घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या खलाशांना तिथे उतरण्यास गुजरातच्या प्रशासकीय विभागाने नकार दिला. महाराष्ट्र सरकारमार्फत मात्र, कोणताही आदेश न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव महाराष्ट्रातील जवळपास ७०० खलाशी असणाऱ्या बोटींना वेरावळ, पोरबंदर येथे परतावे लागले.