पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दत्त स्नॅक्स हॉटेलमध्ये एका चोरट्याने रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलमधील रोख रक्कम घेऊन चोरटा पसार - पालघर क्राईम बातम्या
चोरीची ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दत्त स्नॅक्स या हॉटेलमध्ये बुधवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास एक चोरटा शिरला. हॉटेलच्या गल्यात ठेवलेली रोख रक्कम घेऊन हा चोरटा पसार झाला आहे. चोरीची ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याचा शोध सुरू केला आहे. चोरी करणारा आरोपी मनोर व आसपासच्या परिसरातील असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी मनोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.