महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पदपथावरील गटारावर झाकण नसल्याने घोडा पडला गटारात - horse fell into whole in palghar

गोठणपूर परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने गटारात पडला. तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने हे गटार व पदपथ तोडून  घोड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

घोडा पडला पदपथावरील झाकण नसलेल्या गटारात

By

Published : Aug 13, 2019, 5:09 PM IST

पालघर- येथील गोठणपूर परिसरात आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक घोडा बंदिस्त गटारावर झाकण नसल्याने गटारात पडला. घोडा गटारात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घोड्याला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने हे गटार व पदपथ तोडून घोड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

घोडा पडला पदपथावरील झाकण नसलेल्या गटारात
घोडा बाहेर येण्याचा प्रयत्न करत पुढे सरकू लागला. मात्र, गटार बंदिस्त असल्यामुळे तो आत अडकला. आसपासच्या नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी या घोड्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते घोड्याला बाहेर काढू शकले नाहीत. त्यानंतर नागरिकांनी जेसीबी आणून हे गटार व फुटपाथ तोडले व घोड्याला गटारातून बाहेर काढले. गोठणपूर परिसराच्या आसपास शाळा व महाविद्यालय असून रोज हजारो विद्यार्थी व नागरिक या मार्गाने ये-जा करत असतात. पदपथ म्हणून देखील या बंदिस्त गटाराचा वापर केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी या गटारावर झाकण नाहीत. गटारावर झाकण नसल्यामुळे आज एक घोडा या गटारात पडला. रात्री-अपरात्री या मार्गावरुन नागरिक व विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे कोणती दुर्घटना झाल्यावर यास जबाबदार कोण? असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन या गटारावर झाकणे बसवावित, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दोन वर्षापासून झाकणे उघडीच असून नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी याबाबत तक्रार करुनही ठोस अशी पावले उचलली गेली नाहीत. यात एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? असे या प्रभागाचे नगरसेवक दिनेश बाबर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details