महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये पुन्हा आढळले विलगीकरण केलेले कोरोना संशयित प्रवासी - corona palghar

पाचही कोरोना संशयित प्रवासी आफ्रिकेहून दुबईमार्गे भारतात परतले होते. विमानतळावरून हे प्रवासी खासगी वाहनाने जिल्ह्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रवाशांना गाठले व त्यांच्या हातावरील विलगीकरणाचे शिक्के तपासले.

corona palghar
प्रतिकात्मक

By

Published : Mar 22, 2020, 9:10 PM IST

पालघर- शहरात पुन्हा एकदा विलगीकरणाचे शिक्के मारलेले ५ कोरोना संशयित प्रवासी आढळले आहेत. प्रशासनाने या सर्व कोरोना संशयितांवर कारवाई केली असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

पाचही कोरोना संशयित प्रवासी आफ्रिकेहून दुबईमार्गे भारतात परतले होते. विमानतळावरून हे प्रवासी खासगी वाहनाने जिल्ह्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रवाशांना गाठले व त्यांच्या हातावरील विलगीकरणाचे शिक्के तपासले. त्यानंतर, प्रशासनाने या सर्व प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांची चौकशी केली. नंतर, खाजगी वाहनाने या प्रवाशांना गुजरात राज्यातील त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले.

हेही वाचा-जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना भरवले आरोग्य शिबिर, गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details