पालघर - जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत पावसामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या २२ नागरिकांचा जीव वाचवण्यात पालघर पोलीस दलाला यश आले. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावरील अडथळे दूर करत वाहतूक देखील सुरळीत केली. त्यामुळे पालघर पोलीस दलाच्या या कार्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले असून पालघर पोलिसांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर पोलिसांचे केले कौतुक..! - गृहमंत्री अनिल देशमुख पालघर पोलीस
पालघर पोलीस दलाच्या कार्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे. पालघर पोलिसांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
पालघर पोलीस
अनेक ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी रस्त्यावर असलेले अडथळे दूर करून पोलिसांना बचावकार्यासाठी पोहोचावे लागले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक व जनजीवन सुरळीत करण्यात पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.
संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी पालघर पोलिसांनी केलेल्या कार्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. पालघर पोलिसांचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले असून पालघर पोलिसांच्या कार्यतत्परतेचा अभिमान वाटतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.