पालघर- बहुजन विकास आघाडीकडून वसई विधानसभा मतदारसंघातून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रविणा ठाकूर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. वसई विधानसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीकडून एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ऐनवेळी हितेंद्र ठाकूर कोणाचा अर्ज निवडणुकीसाठी ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार हितेंद्र ठाकूरांचा उमेदवारी अर्ज दाखल हेही वाचा -टेम्पो-बस अपघातात टेम्पो पुलाखाली पडला; जीवितहानी नाही
अर्ज दाखल करताना बहुजन विकास आघाडीकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी हितेंद्र ठाकूर आपला लकी शर्ट घालून आले होते. माझ्या एका मित्राने हा शर्ट मला दिला आहे. अगदी पहिल्या निवडणुकीपासून हा शर्ट म्हणजेच ३० वर्षांपासून असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - नवरात्रोत्सव 2019 : केळवे युवक मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी वसईचे चिमाजी आप्पा मैदान, पार नाका, झेंडा बाजार वसई तहसीलपर्यंत रॅली काढून वसईच्या प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत 5 हजारांहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ठाकूर यांनी आपणच निवडून येणार, असा विश्वास व्यक्त केला.