लायकी नसलेल्या माणसांबद्दल मला बोलायची इच्छा नाही - हितेंद्र ठाकुरांचा विलास तरेंना टोला - boisar assembly election
हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीतुन ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवलेले आमदार विलास तरेंवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले. निवडणुकीच्या तोंडावर तरेंच्या शिवसेना प्रवेशावर म्हणाले की, मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही.
पालघर- बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. याचनिमित्ताने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाडफाटा येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीतुन ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवलेले आमदार विलास तरेंवर निशाणा साधत टीकास्त्र सोडले. निवडणुकीच्या तोंडावर तरेंच्या शिवसेना प्रवेशावर म्हणाले की, मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही. तसेच बविआचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांनी या भागात बविआतर्फे अनेक विकासकामे केली आहे. नागरी समस्या नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.