पालघर - नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडली. शनिवारी शहरात गणेशमूर्ती चे आगमन होत असल्याने वाहतूक कोंडीत जास्तच भर पडली.
नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी - पालघर वाहतूक कोंडी
नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडली. शनिवारी शहरात गणेशमूर्ती चे आगमन होत असल्याने वाहतूक कोंडीत जास्तच भर पडली.

नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी
नालासोपारा तुळींज रोडवर वाहतुकीची कोंडी
ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होत आहे. ही वाहतूक समस्या काही नवीन नाही. इथली वाहतूक समस्या आता नित्याचीच झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालक वैतागले आहेत. वाहतूक पोलिसांची कमतरता याला कारणीभूत आहे. तसेच रस्त्यावरील फेरीवाले , वाहनांची पार्किंग व उलट दिशेने वाहने घुसत असल्याने त्यात अधिक भर पडते. वाहतूक विभागाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायला हवी. अशी वाहनचालकांची मागणी आहे.
Last Updated : Aug 17, 2019, 11:25 PM IST