पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. मोडक सागर आणि तानसा धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्याही पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पालघरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ - सातपाटी समुद्र किनारा
पालघर येथील सातपाटी समुद्र किनारी ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे वाहू लागले आहेत. जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालघरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहत आहेत. हवामान विभागानेही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. रायगड, ठाणे व पालघरला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पालघर येथील सातपाटी समुद्र किनारी ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे वाहू लागले आहेत. जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.