पालघर /वसई - मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या तौक्ते या चक्रीवादळाचा प्रभाव वसई-विरार परिसरात पाहायला मिळत असून काल रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने लावली. ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून शहरी व ग्रामीण ठिकाणी झाडांच्या पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
तौक्ते चक्रीवादळ; वसई विरारमध्ये पावसाची हजेरी; प्रशासनाचा सर्तकतेचा इशारा - heavy rain in vasai virar
वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे काही घरांचेही नुकसान झाले आहे. कालपासून (रविवार) सुरू झालेल्या पावसामुळे शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. तर अनेक ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्याच्या घटना समोर येत आहेत.
वसई विरारमध्ये काल रात्रीपासून पावसाची हजेरी
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे काही घरांचेही नुकसान झाले आहे. कालपासून (रविवार) सुरू झालेल्या पावसामुळे शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. तर अनेक ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्याच्या घटना समोर येत आहेत. आज दिवसभरात कधीही हे वादळ पालघरच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसाळ यांनी केले आहे.