पालघर - पहाटे 5 वाजेपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. त्यामुळे अनेक दिवसापासूनच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच भात पेरणी करून चिंतेत असलेला शेतकरीही समाधानी झाला आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; शेतकरी सुखावला - जिल्ह्यातील
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. त्यामुळे अनेक दिवसापासूनच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच भात पेरणी करून चिंतेत असलेला शेतकरीही समाधानी झाला आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
पावसामुळे शहरी भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याचे पहावयास मिळाले. काही दिवसांपूर्वी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी भात पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने 4 ते 5 दिवस दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र आज सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानचे वातावरण आहे .