महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीने पालघरच्या वाडा तालुक्यात शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट - vasai virar

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे पेरलेले बियाणे पुराच्या पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तर काही शेतकरीवर्ग बियाणे पेरणीकरीता पावसाची उसंत मिळेल आणि लांबणीवर पडलेला शेती हंगाम पुन्हा साधण्याच्या आशेने पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे पहात आहे.

अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे गेले वाहून

By

Published : Jul 1, 2019, 9:04 PM IST


पालघर (वाडा) - पालघर जिल्ह्यासह वाडा तालुक्यात आज चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येथील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पुराने शेतात घातलेले बांध वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक जणांची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय त्यांच्यासमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे गेले वाहून

गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पेरलेले बियाणे पुराच्या पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर काही शेतकरीवर्ग बियाणे पेरणीकरिता पावसाची उसंत मिळेल आणि लांबणीवर पडलेला शेती हंगाम पुन्हा साधण्याच्या आशेने पावसाच्या उसंतीच्या वाटेकडे पाहात आहे.

पालघर जिल्ह्यातील सुर्या नदीला पूर आल्याने वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मासवन इथल्या पंपिंग स्टेशनला व धुकटन इथल्या सब पंपिंग स्टेशनला पुराचा फटका बसला आहे. तेथे तांत्रिक बिघाड झाल्याने वसई-महानगरपालिका नगरवासियांना काहीवेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिका पाणीपुरवठा विभागाकडून सूचना जारी केली आहे. पालघर जिल्ह्यात १ जुलैला २२०.३६ मिमी.सरासरीने पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात येते आहे. तर वाडा तालुक्यात २९२ मिमी अशी सर्वाधिक पावसाची नोंद कंचाड महसूल विभागात झाली आहे. तर वाडा महसूल विभाग १६९ मिमी. कुडूस -१९० मिमी. तर कोने -१५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वाडा तालुक्यातील कमी उंचीच्या पालसई, कंचाड या भागातील कमी उंचीच्या पुलावरून वाटते सखल भागातील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने काही वाहचालकाना वाहन चालविणे कठीण बनले होते. तर काही ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details