महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळी पावसाच्या तडाख्याने पालघरमध्ये घरांचे आणि अन्न धान्याचे नुकसान - Sunil Bhusara visit villagers in Mokhada

पालघर जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाच्या तडाख्याने गावकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार, सभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

MLa visit villagers in Mokhada
आमदार सुनील भुसारा

By

Published : May 1, 2020, 7:25 PM IST

पालघर - जिल्ह्यातील मोखाडा भागात अवकाळी वादळी पावसाच्या वाऱ्याने कौलारू घरांचे कौले, पत्रे व अन्न धान्याचे नुकसान केले आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार, सभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

पालघरमध्ये घरांचे आणि अन्न धान्याचे नुकसान

या पाहणी वेळी अचानकपणे वादळी पावसाने मोखाड्यातील कुर्लड सूर्यमाळ भागात सायंकाळच्या सुमारास घरांचे नुकसान केले व पावसाने अन्न धान्य भिजविले आहे. याची पाहणी करण्यासाठी त्यांनी या भागाचा दौरा करून नुकसानग्रस्तांना शासकीय स्तरावर मदत देऊ करण्याचे आश्वस्त केले. या वेळी भागात येताना त्यांना कोसळलेली झाडे व विजेचे खांब ही अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा हा डोंगर दऱ्यामध्ये वसला आहे. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद गोमघर, दुधगाव या भागात ढगांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत असून हलक्या सरी कोसळत आहेत.

सुनील भुसारा यांनी बाईकवर त्या गावात पोहचत येथील आपत्ती ग्रस्तांना दिलासा दिला

आमदार सुनील भुसारा यांनी बाईकवर त्या गावात पोहचत येथील आपत्ती ग्रस्तांना दिलासा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, कुसुम झोले, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रजीत नायर, तहसीलदार विजय शेट्ट्ये उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details