महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-भुईगाव समुद्रकिनारी सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह - पालघर वसई

भुईगाव समुद्रकिनारी लाटांसोबत एक सुटकेस किनाऱ्यावर धडकले होते. या सुटकेसमधून दुर्गंध येत असल्याने काहीतरी विचित्र प्रकार असावा, असा संशय स्थानिकांना आला. त्यामुळे त्यांनी ही बाब पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

सुटकेस
सुटकेस

By

Published : Jul 26, 2021, 8:10 PM IST

Updated : Jul 26, 2021, 9:52 PM IST

वसई (पालघर) - वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये सोमवारी (आज) दुपारी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले आहे.

वसई-भुईगाव समुद्रकिनारी सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

अशी मिळाली माहिती

भुईगाव समुद्रकिनारी लाटांसोबत एक सुटकेस किनाऱ्यावर धडकले होते. या सुटकेसमधून दुर्गंध येत असल्याने काहीतरी विचित्र प्रकार असावा, असा संशय स्थानिकांना आला. त्यामुळे त्यांनी ही बाब पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने या सुटकेस विषयीची माहिती पोलीस ठाण्यात दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुटकेस ताब्यात घेऊन उघडली असता त्यामध्ये महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळला. सुटकेसमधील मृतदेह बघून पोलीसही हादरले. पोलिसांनी तातडीने हा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

एका महिन्यात तीन घटना

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित मृतदेह हा समुद्रात भरती आले असताना टाकण्यात आला असावा. त्यानंतर आता ओहटी असल्याने मृतदेहाची सुटकेस किनाऱ्यावर आला आहे. मृतदेहाची ओळख पटवले नसले तरी पोलीस त्यांच्या स्तरावर या प्रकरणाचा उलगडा करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी स्वतंत्र चार पथके तयार केली आहेत. दरम्यान; या एकाच महिन्यात तीन मृतदेह वसई पोलीस ठाणे हद्दीत सापडले आहेत. दोन मृतदेह हे वसई पाचूबंदर समुद्र किनाऱ्यावर तर आज एक मृतदेह भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे. १५ जुलैला अनोळखी पुरुषाचा मृतदेह किल्लाबंदरला सापडला होता. त्याआधी १२ जुलैला ममता पटेल या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा किल्ला बंदर येथे मृतदेह सापडला होता. ममता पटेल या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या आणि त्या बेपत्ता झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता.

Last Updated : Jul 26, 2021, 9:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details