महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, गवाकऱ्यांची फ्री स्टाइल हाणामारी - गवाकऱ्यांची हाणामारी

हळदीच्या कार्यक्रमात काही तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली आणि ती पुढे एवढी वाढली, की गावातील शेकडो तरुणांमध्ये तीन ते चार गट पडून आपापसांत फ्री स्टाइल हाणामारी झाली. या संपूर्ण गर्दीत ना कोणाच्या तोंडाला मास्क होते ना कोणाकडून कोरोना नियमांचे पालन केले जात होते.

फ्री स्टाइल हाणामारी
फ्री स्टाइल हाणामारी

By

Published : May 16, 2021, 3:57 PM IST

पालघर -विरारजवळच्या सकवार गावात हळदीच्या कार्यक्रमात शेकडो गावकाऱ्यांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. कोरोनाचे वाढते संकट असताना देखील या गावात राहणाऱ्या तांबडी कुटुंबीयांच्या घरी शनिवारी हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंचवीस-पन्नास नव्हे तर तब्बल अडीचशेपेक्षा जास्त ग्रामस्थांची उपस्थिती होती.

हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, गवाकऱ्यांची फ्री स्टाइल हाणामारी

क्षुल्लक कारणावरुन हाणामारी

या हळदीच्या कार्यक्रमात काही तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली आणि ती पुढे एवढी वाढली, की गावातील शेकडो तरुणांमध्ये तीन ते चार गट पडून आपापसांत फ्री स्टाइल हाणामारी झाली. या संपूर्ण गर्दीत ना कोणाच्या तोंडाला मास्क होते ना कोणाकडून कोरोना नियमांचे पालन केले जात होते. शेकडोच्या गर्दीत सुरु असलेल्या हाणामारीचा हा सर्व प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता या गावकाऱ्यांवर विरार पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन

हेही वाचा -Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details