महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील 14 लाखांचा गुटखा जप्त - मुंबई-अहमदाबाद महामार्ग

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोळ गावच्या हद्दीत कासा पोलिसांनी 14 लाख 17 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ट्रक चालकाला ताब्यात असून मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस
जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस

By

Published : Dec 20, 2019, 1:52 AM IST

पालघर- येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोळ गावच्या हद्दीत कासा पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रकमधील 14 लाख 17 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - पालघर : बोईसर येथे अवैधरित्या राहणाऱ्या 12 बांगलादेशींना 'एटीएस'ने केली अटक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोळ गावच्या हद्दीत कासा पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एका ट्रकमध्ये (क्र. एम एच 04 जी आर 4017) विविध प्रकारचे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या 14 लाख 17 हजार रुपये किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल व ट्रक जप्त करत ट्रकचालक मोहम्मद जहीर मंजुर अली (वय 32 वर्षे) याला अटक केली आहे. तसेच त्याच्यासह टेम्पोच्या मालकावर कासा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केले आहेत.

हेही वाचा - वसईत गळा आवळून पत्नीची हत्या, आरोपी पती गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details