पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. चारोटी टोलनाक्यावर पकडलेल्या वाहनातून 1 लाख 64 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई - गुटखा जप्त
महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांना होंडा सिटी कारवर संशय आला. त्यांनी या गाडीची कसून तपासणी केली. त्यात 1 लाख 64 हजार रुपयांची तंबाखू आणि गुटख्याची पाकिटे आढळली. पोलिसांनी हा साठा आणि गाडी जप्त केली.
हेही वाचा - अंधश्रद्धा : पैशांचा पाऊस पाडून विधवा महिलांवर अत्याचार
महामार्गावरील चारोटी टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांना होंडा सिटी कारवर संशय आला. त्यांनी या गाडीची कसून तपासणी केली. त्यात 1 लाख 64 हजार रुपयांची तंबाखू आणि गुटख्याची पाकिटे आढळली. पोलिसांनी हा साठा आणि गाडी जप्त केली. कार चालक विक्रम देवमनी दुबे (वय 32, रा. दहीसर, मुंबई) मालक मुकेश दिलीप जैसवाल (वय 32, रा. मिरारोड) या दोघांविरोधात कासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. कासा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.