पालघर -भारतीय जनता पक्षाला घाणेरडे राजकारण करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. त्यांनी केलेल्या या राजकारणाचा परिणाम बिहार निवडणुकीच्या निकालात दिसेलच. निकालानंतर भाजपाचे बिहारमधील राजकारणही संपेल, असा खोचक टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. पालघरमध्ये आज जिल्ह्यातील पाणी प्रश्नाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
प्रत्येक गाव व पाड्यांपर्यंत पोहोचवणार पाणी -
पालघर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस होतो. मात्र, तरीही अनेक गावे आणि पाडे पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासन काम करत आहे. आतापर्यंत पाणी पुरवठा विभागाचे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यात जास्तीत जास्त कामकरून सर्वच नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले.