महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पालघर जिल्ह्याचे कामकाज हक्काच्या मुख्यालय संकुलातून सुरू होण्याच्या दृष्टीने काम करणार' - पालघर जिल्हा

पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासी बांधवांचे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. ती वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून उत्पादन वाढीसाठी भातपीकाखेरीज बागायती, फुले व भाजीपाला शेती कशी करता येईल, याबाबत प्रयत्नशील असणार असल्याचेही पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

पालकंमत्री दादा भुसे
पालकंमत्री दादा भुसे

By

Published : Jan 23, 2020, 8:07 AM IST

Updated : Jan 23, 2020, 8:53 AM IST

पालघर -जिल्हा निर्मितीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालये अजूनही भाडेतत्वारील इमारतींमध्ये सुरू आहेत. जिल्हा मुख्यालय उभारण्याचे काम आता पूर्णत्वास येत आहे. लवकरच जिल्ह्याचे कामकाज नवीन मुख्यालय संकुलातून सुरू होण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याचे जिल्ह्याचे पालकंमत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. मच्छिमार सोसायटीच्या सभागृहात भुसे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पालकंमत्री दादा भुसे

हेही वाचा -पालघरमध्ये साडेनऊ लाखांची वीजचोरी, महावितरण भरारी पथकाची कारवाई

पूर्वीचा ठाणे आणि आताच्या पालघर जिल्ह्यात आपल्या जीवनाला सुरुवात झाली. जिल्ह्याशी आदर आणि आपुलकीचे नाते असून सर्वजण एकत्र मिळून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी काम करू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. अदिवासी बांधवांचे स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. ती वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून उत्पादन वाढीसाठी भात पिकाखेरीज बागायती, फुले व भाजीपाला शेती कशी करता येईल याबाबत प्रयत्नशील असणार असल्याचेही भुसे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jan 23, 2020, 8:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details